Skip to content Skip to footer

…….आता थेट शहा यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बरोबर

…….आता थेट शहा यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बरोबर

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरून राज्यात नाही तर संपूर्ण देशात भाजपाच्या या पुस्तकावर टीका होताना दिसून येत होती. या मुद्द्यावरुन विरोधीपक्षांनी भाजपावर टीकेची झोड उठवली होती. यातच आता भाजप खासदाराने गृहमंत्री अमित शहा यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर बोचरी टीका केली आहे.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शाह यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुनयी खासदारांकडूनही होत आहे, असे म्हणत राष्ट्रवादीने टोला लगावला आहे. राष्ट्रवादीने यासंदर्भात ट्विट केले आहे.

भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी अमित शहा यांना एक पेंटींग भेट दिली आहे. या पेंटीगमध्ये अमित शहा आणि सरदार पटेल यांचा अर्धा-अर्धा चेहरा दाखवण्यात आला आहे. यारुन राष्ट्रवादीने भाजपला सुनावलं आहे. दरम्यान, मोदींची तुलना महाराजांशी केल्याने निर्माण झालेला वाद थंड होण्याची चिन्ह असतानाच आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5