Skip to content Skip to footer

दक्षिणम खाद्योत्सवाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते उदघाटन

दक्षिणम खाद्योत्सवाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते उदघाटन

रामराजे शैक्षणिक संकुल यांच्या तर्फे आयोजित दक्षिणम खाद्योत्सवाचे आमदार योगेश रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स दक्षिणम खाद्योत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. या कार्यक्रमाद्वारे खवय्यांसाठी मोठी पर्वणी उपलब्ध करून देऊन एक उत्तम उपक्रम राबविला गेला आहे असे वक्तव्य आमदार कदम यांनी केले होते. आमदार योगेश कदम यांनी संपूर्ण महोत्सवास भेट देऊन मेजवानीचा आस्वाद ही घेतला. तसेच स्टॉल लावलेल्या विविध महिला बचत गटाचे आयोजकांचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले.

याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, शिवसेना तालुका संघटक रोहिणी दळवी, नगराध्यक्षा परवीन शेख, पंचायत समिती सदस्य वृषाली सुर्वे, नगराध्यक्ष राजेंद्र पाटेकर, नगरसेविका शबनम मुकादम, कृपा घाग, उल्का जाधव, नगरसेवक मंगेश राजपुरकर, विवेक खडपकर, विकास जाधव, शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच रामराजे शिक्षण संकुलाचे अधिकारी, पदाधिकारी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5