Skip to content Skip to footer

आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

        शिवसेना आमदार योगेश रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसांचे महाआरोग्य शिबिर दापोली मतदार संघात भरविण्यात आले आहे. या शिबिराचा सुमारे ५००० रूग्णांनी लाभ घेतला. ह्रदयचिकित्सा, नाक-कान-घसा, महिलांच्या वैद्यकिय समस्या, लहान मुलांचे आजार, दंतविकार, इ.सी.जी इत्यादी सर्व प्रकारचे मोफत चिकित्सा, औषधे व चष्मे वाटप करण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा व तालुका रुग्णालयांनी सुद्धा या उपक्रमाला सर्व प्रकारची मदत केली.

                या शिबिरास शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या सहाय्याने सहा रूग्णालयाच्या सुमारे १२ डाॅक्टर व इतर ३५ सहका-यांसह २ दिवस या शिबिरात सहभाग घेतला. तसेच या शिबिरामध्ये ३१ रूग्णांवर अॅजिओग्राफी – एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया व २-डी एको तपासणी करण्याची गरज असल्याचे आढळून आले. १ महिलेच्या पोटात गाठ असल्याचेही आढळून आले. किमान ४० रूग्णांनावर मूळव्याध, मूतखडा व अपेंडिक्स सारख्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे आढळून आले आहे.

            या सर्व शस्त्रक्रिया आमदार योगेश कदम, साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मशिलकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सहकार्याने ठाणे, मुलुंड व मुंबई सारख्या ठिकाणी विनामूल्य करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5