Skip to content Skip to footer

संभाजी ब्रिगेड कडून मुख्याधिकाऱ्यांना धुळीचे बॉक्‍स भेट

श्रीगोंदे – श्रीगोंदा शहरातील दौंड-जामखेड रस्त्याची दूरवस्था झाली असून, रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांनाच धुळीचे बॉक्‍स भेट देण्यात आले.

दौंड-जामखेड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसभर रस्त्यावरून धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संभाजी ब्रिगेडतर्फे अनोखे आंदोलन करत धूळ मिठाईच्या बॉक्‍समध्ये भरून ती मुख्याधिकारी विश्‍वंभर दातीर यांना भेट देण्यात आली.

धुळीमुळे नागरिकांचे जगणे मुश्‍किल झाले असताना नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही भोस यांनी यावेळी केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5