Skip to content Skip to footer

मंत्री हसन मुश्रीफ यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हान…..!

मंत्री हसन मुश्रीफ यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हान…..!

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित असेल, तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. असं आव्हानच मुश्रिफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे.

आमदार चंद्रकांत पाटलांनी आंदोलनच्या आधी पीक कर्ज वाटपाची कदाचित नीट माहिती घेतली नसावी. ज्या जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप झालं आहे. त्या जिल्हा बँकेविरोधातच भाजपा आंदोलन करत आहे. हा प्रकार हास्यास्पद असल्याचंही मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे. राज्यभरात भाजपाची आंदोलनं पार पडली. यामध्ये बँकांसमोर आंदोलनं करण्यात आली. मात्र कोल्हापुरात भाजपानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपाची नामुष्की दिसून येते, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला आहे.

Leave a comment

0.0/5