Skip to content Skip to footer

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊंना मानाचा मुजरा ! अण्णा भाऊ हे केवळ कलावंत नव्हते, तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवले, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.

आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मना-मनात पोहचवला. आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली. अण्णाभाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a comment

0.0/5