Skip to content Skip to footer

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर…

नारायण राणे यांचे खंदे समर्थेक आणि वडाळा-नायगाव विभागातून गेली ३० वर्ष आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांनी भाजपा पक्षात प्रवेश केलेला आहे. पण अजून सुद्धा या गोष्टीची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. मागील एक-दिड वर्षा पासून कालिदास कोळंबकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. त्यामुळे कुठेतरी त्यांनी नारायण राणे यांना सोडून भाजपा गोटात प्रवेश केला होता.
बिडीडी प्रकल्पाच्या भूमिपूजन उदघाटन सोहळ्याला सुद्धा भाजपाच्या स्टेजवर कोळंबकर दिसले होते. तसेच त्यांनी या प्रकल्पा बद्दल मुख्यमंत्र्यांची स्तुती सुद्धा केलेली दिसून येत होती. कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालया समोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला आहे.

असा खासदार अमेठीत नको आहे, राहुल गांधी यांच्या बालेकिल्यात धक्का

कोळंबकर यांनी यापूर्वी गणेशोत्सवातही बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना पक्षाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करताना कालिदास कोळंबकर दिसले तर वडाळा आणि नायगाव विभागातील नागरिकांना आश्चर्य वाटायला नको. या बद्दल काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कडून अजून सुद्धा काहीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.
इतकी वर्ष काँग्रेसचे आमदार असूनही प्रश्न सुटले नाहीत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची कामं केली आहे. त्यामुळेच आपण मुख्यमंत्र्याच्या पाठिशी आहोत, असं कोळंबकर म्हणाले. पण कोळंबकर यांनी भाजप प्रवेशासाठी काही अटी ठेवल्याचंही सांगण्यात आलेल्या आहेत. यावर मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस कोळंबकर यांच्या अटी पूर्ण करून त्यांना भाजपा पक्षात प्रवेश करून घेतात का हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल परंतु वडाळा-नायगाव भागात शिवसेना पक्षाला आगामी निवडणुकीला मदत होईल आणि काँग्रेस पक्ष हा दादर मधून हद्दपार झालेला पुन्हा एकदा दिसून येईल.

Leave a comment

0.0/5