Skip to content Skip to footer

उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोवर लिहीलेल्या कॅप्शने वेधले साऱ्यांचे लक्ष

उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोवर लिहीलेल्या कॅप्शने वेधले साऱ्यांचे लक्ष

विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सामानाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना मातोंडकर म्हणाल्या की, शिवसेनेकडून पक्षप्रवेशाबाबत कोणताही आग्रह धरण्यात आलेला नव्हता, पण मी स्वत:हूनच सक्रिय राजकारणात परतण्यासाठी हा निर्णय घेतला, असे त्यांनी बोलून दाखविले.

उर्मिला यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्या साडीतील दोन फोटो मातोंडकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर त्यांनी वेगळी साडी परिधान करून एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्यांनी लिहीलेले कॅप्शन साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाले आहे. “(माझ्याकडून) नेहमीच तुम्हा सर्वांना सकारात्मक ऊर्जा, प्रेम, कारूण्य आणि सदिच्छा मिळत राहतील”, असे म्हणत त्यांनी सर्व फॉलोअर्सना सुप्रभात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5