Skip to content Skip to footer

..आणि छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरत सोडवली टोल नाक्यावरची वाहतूक कोंडी

जाणून घ्या घोटीच्या टोल नाक्यावर नेमकं काय घडलं..

नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोक मुंबईहून बाहेर जाण्याचा पर्याय निवडत आहेत. मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने अनेकांना मे महिन्याच्या सुट्टीतही बाहेर जाता आलं नव्हतं. आता मात्र अनलॉकच्या दरम्यान प्रवासाची मुभा देण्यात आल्याने अनेक लोक मुंबईबाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत मुंबई नाशिक महामार्गावरुन जात असताना महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ घोटी टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांची कार जेव्हा घोटी टोल नाक्याजवळ आली तेव्हा त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या कारमधून उतरुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हातभार लावला.

 

 

अनेक वाहनांना विना टोल जाऊ देत छगन भुजबळ यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांचं हे रुप टोल नाक्यावरचे कर्मचारी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चकित करणारंच ठरलं.

Leave a comment

0.0/5