Skip to content Skip to footer

विचार करा जर पोलिसांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर?, – उद्धव ठाकरे

विचार करा जर पोलिसांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर?, – उद्धव ठाकरे

कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले गेले आहे. लॉकडाऊन केलं. घरातून काम करण्याचे म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले. पण विचार करा जर पोलिसांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर? अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पोलिसांचे कौतुक केले आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीसंही माणसं आहेत. पण तरी तुम्ही दक्ष राहता, म्हणून आम्ही सण साजरे करू शकतो. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक नागरिक म्हणून तुमचे आज आभार मानतो. अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामचे तोंडभरून कौतुक केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज नववर्षाचे स्वागत मुंबई पोलिसांसोबत मुंबई पोलीस आयुक्तालयात केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण तुमच्या कर्तृत्वाला कशाचीच तोड नाही. ही परंपरा १०० ते १५० वर्षांपासूनची आहे. त्यामुळे कुणीही कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कुणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले होते.

Leave a comment

0.0/5