Skip to content Skip to footer

भाजपची दोन दिवस मॅरेथॉन बैठक, मात्र बैठीकीत विनोद तावडेंना स्थान नाही

भाजपची दोन दिवस मॅरेथॉन बैठक, मात्र बैठीकीत विनोद तावडेंना स्थान नाही

भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय मॅरेथॉन बैठीकीच आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या ५ आणि ६ जानेवारीला ही मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका, सध्याची राजकीय स्थिती, ग्राम पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका या विषयी चर्चा होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

मात्र राज्य कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित असताना, विनोद तावडे यांना मात्र या बैठकीला स्थान देण्यात आलेले नाही. विनोद तावडे हे राज्य कार्यकारिणीमध्येही नाहीत. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहू शकतात. मात्र पक्षाचा जुना जाणता नेता असताना, महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असणं अपेक्षित नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत मात्र या बैठीकीमध्य विनोद तावडे यांना स्थान देण्यात आलेले नाही.

Leave a comment

0.0/5