Skip to content Skip to footer

काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला

काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला

शहरांची नावे बदलण्याचा सपाटा लावलेल्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी चीन बरोबर संघर्ष सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं नाव बदलून कमलम (कमळ) असे ठेवले आहे.

फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगले नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आले आहे, असे सांगत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली होती. यावरूनच आता जेष्ठ लेखक आणि दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी भाजपाच्या या निर्णयाला जोरदार टोला लगावला आहे.

जावेद अख्तर यांनी एक ट्वीट केले आहे. ‘गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रूट हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव कमलम असे असायल हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील. खरच हे सर्व मजेदार आहे’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. आता या ट्विटला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5