Skip to content Skip to footer

घणसोलीत भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेत, गणेश नाईकांना धक्का

घणसोलीत भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेत, गणेश नाईकांना धक्का

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर असताना माजी मंत्री गणेश नाईक यांना जोरदार धक्के बसत आहेत. १४ नगरसेवकांच्या पाठोपाठ आता घणसोलीतील भाजपाच्या २५ पदधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरु झाल्यामुळे भाजपाची अवस्था नवी मुंबईत अधिक बिकट झाली आहे.

नवी मुंबईत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, जिल्हा सचिव बिपीन तायडे, घणसोली तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांच्यासह २५ पदाधिकाऱ्यांनी आपल्यापदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या सर्व पदधिकाऱ्यांचे शिवसेना उपनेते-महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय नहाटा यांनी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले आहे. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईत नाईक गटाची डोकेदुखी वाढली आहे.

Leave a comment

0.0/5