Skip to content Skip to footer

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, शरद पवारांकडून खबरदारी म्हणून पुढील सर्व कार्यक्रम रद्द

गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्या नंतर आता अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहीती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे.

” माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.” असं ट्विट भुजबळांनी केले आहे.

भुजबळ यांना कोरोनाची लागण झल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम सुरक्षितेच्या कारणास्तव रद्द केले आहे. शरद पवारांनी १ मार्च पर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. याची माहीती स्वतः ट्विट करून दिली आहे.

‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. असं ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5