Skip to content Skip to footer

विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेतेपदी…..

राधा-कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधीमंडळ पदाला राजीनामा दिल्यानंतर त्याजागी काँग्रेस पक्षा कडून कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु आता यावरून सस्पेंस उठला आहे. विधीमंडळ नेतेपदी काँग्रेस पक्षाने बाळासाहेब थोरात यांच्या नावाची शिफारस केलेली आहे.

काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव खेळला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद येणाऱ्या विधासभेला जास्त उफाळून येणार आहे. विखे-पाटील यांनी पक्ष विरोधी भूमिका घेत भाजपा उमेदवार सुजय यांच्या प्रचाराला सुरवात केल्यावर काँग्रेस मधून फक्त थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली होती.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक बदल सुद्धा महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी समिती मध्ये करण्यात आलेले आहे.विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवाय, बसराज पाटील यांच्याकडे काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत होते. पण, त्यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसने नवीन चेहऱ्यांना देखील संधी दिली आहे. प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांची देखील प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नसीम खान यांच्या खांद्यावर विधानसभा उपगट नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बदलाचा येणाऱ्या निवडणुकीला फायदा होईल का? की काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसेल हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट दिसून येईल.

Leave a comment

0.0/5