Skip to content Skip to footer

धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी……

राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूस ता. अंबेजोगाई येथील शेतकरी धरणे आंदोलनाला बसले आहेत. अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन घेताना जमिनीचा मोबदला आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यात नोकरी देण्याचे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु, सांगितल्याप्रमाणे जमिनीचा मोबदलाही दिला नाही आणि नोकरीही दिली नाही.शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून धनंजय मुंडे यांनी जमीन व्यवहारात फसवणूक केली असा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब धरणे आंदोलनाला बसले आहेत.

अधिवेशन काळातच शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून आंदोलन सुरू केल्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे

Leave a comment

0.0/5