Skip to content Skip to footer

भाजपाचा राष्ट्रवादीला टोला, जिंकता येईना ईव्हीएम वाकडे…

सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागळ्यामुळे विरोधक सत्ताधारी भाजपा पक्षावर बेछुड आरोप करत आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून तर कोणत्याना कोणत्या कारणावरुन भाजपाच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. ईव्हीएमवर बराच नियंत्रण दिसतंय अशी पोस्ट काही दिवसापूर्वी राष्ट्र्वादीने भाजपाला टार्गेट करून आपल्या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध केली होती. त्यातच भाजपाने सुद्धा राष्ट्रवादीच्या लागवलेल्या आरोपांवर जोरदार उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे विधीमंडळाचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेवटच्या भाषणात मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कशाच्या जोरावर या वल्गना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, याची जनतेला पूर्ण कल्पना आहे. अशी टीका राष्ट्र्वादीने केली होती.

दरम्यान राष्ट्रवादीच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. तुमचा स्वतः वर विश्वास नाही, इव्हिएमला कशाला दोष देताय? याला म्हणतात जिंकता येईना, इव्हिएम वाकडे, अशी टीका भाजपने केली आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी प्रमाणेच भाजपनेही एक फोटो ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे.

त्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे दर्शवले आहेत. बारामतीत इव्हिएम ठीक चालतंय, बारामतीचा विजय हा तुमचा. तर दुरीकडे सामान्य जनता महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचे धंदे पवार साहेबांनी बंद करावेत असे म्हणताना दर्शवले आहेत.

Leave a comment

0.0/5