Skip to content Skip to footer

चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्तीने राष्ट्रवादीला भरली धडकी

माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रात मंत्री पदी नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करावी यासाठी भाजपा मध्ये नव्या चेहऱ्याची चाचपणी चालू होती. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला विरोधी पक्षाला घाम फोडणाराच नेता निवडावा अशी मागणी सर्वच भाजपा नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यां कडून होत होती. अशी व्यक्ती सध्या भाजपा पक्षात एकच आहे ती म्हणजे चंद्रकांतदादा पाटील , या नावाची शिफारस खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केलेली होती.

राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीला भाजपा पक्षाने पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवलेली होती. खुद्द राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्या म्हणजे बारामती मतदार संघ काबीज करण्यासाठी चंद्रकांत पाटील बारामती मतदार संघात तळ ठोकून बसले होते. त्यामुळे बारामती मतदार संघ राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा बनला होता. सुळे यांच्या प्रचारासाठी खुद्द राष्ट्रवादीची भली मोठी टीम बारामती मध्ये प्रचारासाठी उतरली होती. हा किल्ला जरी भाजपाला काबीज करता आलेला नसला तरी पाटील यांच्या चाणक्य नीतीने पवार परिवाराला घाम मात्र फुटला होता.

आता पुन्हा एकदा पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करून संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीला अडचणीत आणायचे काम भाजपाने केले आहे. आधीच पाटील आणि पवार यांच्यातील लोकसभा निवडणुकीत असलेले वाद पुन्हा विधानसभा निवडणुकीला उफाळून येणार असेच चित्र दिसून येईल. त्यामुळे जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपा उमेदवारांच्या विरोधात उभे राहणार आहेत. तिथे तिथे राष्ट्रवादीला जिंकण्यासाठी राष्ट्रवादीला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला पुन्हा राष्ट्रवादीचे नुकसान होणार हेच चित्र दिसून येईल.

Leave a comment

0.0/5