Skip to content Skip to footer

सामान्य शिवसैनिकाच्या प्रेमापोटी आदित्य ठाकरेंनी भररस्त्यात थांबवला ताफा!

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद दौरा सुरु आहे. या दौऱ्यानिमित्त आदित्य ठाकरे शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस, विद्यार्थी, महिला अशा सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज अशाच एका सामान्य शिवसैनिकाच्या विनंतीवरून आदित्य ठाकरे यांनी आपला वाहनताफा थांबवला. एवढंच नव्हे तर या शिवसैनिकाच्या टपरीवर त्यांनी चहाचा आस्वादही घेतला. एका सामान्य शिवसैनिकाच्या आग्रहाखातर दौऱ्याचा ताफा थांबवून शिवसैनिकाच्या प्रेमाचा मान राखल्याने शिवसैनिक भारावून गेला होता. आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक सामान्य लोक आपली रखडलेली कामं घेऊन आदित्य ठाकरेंची भेट घेत आहेत. आदित्य ठाकरेसुद्धा प्रत्येकाला भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांनी सामान्य शिवसैनिकाच्या आग्रहाखातर थांबा घेऊन त्याच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत सामान्य शिवसैनिकांची मनं जिंकली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की या शिवसैनिकाची रस्त्याशेजारी चहाची टपरी आहे. सदर शिवसैनिकाला आदित्य ठाकरेंना भेटण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. योगायोगाने ज्या रस्त्याशेजारी या शिवसैनिकांची टपरी आहेत त्याच रस्त्यावरून आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा रवाना होणार होता. याची माहिती मिळताच या शिवसैनिकाने रस्त्याशेजारी उभं राहून आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला हात करून थांबण्याची विनंती केली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवत सदर व्यक्तीची चौकशी केली. यानंतर त्यांना तो शिवसैनिक असल्याचं समजलं. आदित्य ठाकरेंनी वाहनांचा ताफा थांबवल्याने भारावलेल्या या शिवसैनिकाने आदित्य ठाकरे यांना आपल्या टपरीवर चहाचा आस्वाद घेण्याचा आग्रह केला. यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकाच्या प्रेमाचा आदर करत आपले सर्व प्रोटोकॉल मोडून टपरीवर जात चहाचा आस्वाद घेतला. सामान्य व्यक्तीसाठी ताफा थांबवून त्याच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरे यांनी नेता आणि कार्यकर्ता यांचं अनोखं नातं दाखवून दिलं.

Leave a comment

0.0/5