Skip to content Skip to footer

भाजपाने गोड गोड बातमी म्हणून ‘मॅटर्निटी हॉस्पिटल’ केलं – बाळासाहेब थोरात

भाजपाने गोड गोड बातमी म्हणून ‘मॅटर्निटी हॉस्पिटल’ केलं – बाळासाहेब थोरात
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अवघे १५ दिवस उलटले तरी राज्यात अजून काही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही आहे. एकीकडे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला लोकसभा निवडणुकीला ठरलेल्या फॉर्मुल्याची आठवण करून देत आहेत तर दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गोड बातमी-गोड बातमी लवकरच येईल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी मुनगंटीवारांना टोला लगावला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर जोरदार कोपरखळी लगावली. भाजप बऱ्याच काळापासून गोड बातमी देणार गोड बातमी देणार असं म्हणत आहे. मात्र, ती कधी येणार याची वाट पाहतो आहे. गोड बातमी देणार म्हणत भाजपनं मॅटर्निटी हॉस्पिटल सुरू केलं आहे का, असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला.

राज्यातील सत्तास्थापनेतील पेच तयार होण्यासाठी भाजप सर्वस्वी जबाबदार आहे. भाजप मित्रपक्षाला दिलेला शब्द पाळत नसून यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. यात महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

Leave a comment

0.0/5