Skip to content Skip to footer

खासदार श्रीकांत शिंदें यांनी डोंबिवलीतील सोशल डिस्टन्सिंगवरुन व्यक्त केली चिंता…..

डोंबिवलीत सध्या 28 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. तसेच ही चिंतेची बाब आहे. डोंबिवलीतील नागरिक लॉकडाउनचे पालन करताना दिसून येत नाही अजूनही मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर घराबाहेर पडताना दिसून येत आहे. अशी खंत खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या डोंबिवलीकरांच्या बेजबाबदारी मुळे 28 चे 2800 होण्यास वेळ लागणार नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, यासाठी राज्य शासनाकडून वारंवार सूचना सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावर खंत व्यक्त केली.

सध्या देशात नाही तर महाराष्ट्रात सुद्धा झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही काही प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. इतर देशा प्रमाणे भारतात सुद्धा मोठी जीवितहानी होऊ नये म्हणूनच संपुर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला होता. आज डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज हा आकडा 28 वर गेला आहे. मात्र, तरीही डोंबिवलीकर लॉकडाऊनचे काटेकोड पालन न करता सर्रासपणे रस्त्यावर फिरतायत. त्यामुळे 28 चे 2800 व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5