आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलूया जे उघडपणे धमकी द्यायचे. जे मुंबई, देशाची राजधानी बनवू इच्छित होते, ज्याच्या दरबारात विरोधक देखील सहभाग घ्यायचे. त्यांचे नाव आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचे बालपणाचे नाव “बाळ केशव ठाकरे” होते, काळाबराबेर ते “बाळा साहेब ठाकरे” झाले व लाखो मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे नेते बनले. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते व ते नंतर राजकारणी बनले.
एवढेच नव्हे तर ठाकरे एक लोकप्रिय क्रांतिकारक व्यंगचित्रकार होते. १९५० च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाच्या आवृत्तीत त्यांच्येच रेखाटलेले व्यंगचित्रे मुद्रित करण्यात येत होते. १९६o मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली या नंतर त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले होते. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. तेव्हा बाळासाहेबांना विचारण्यात आले की बाळासाहेब लोक तर जमत आहे या संघटनेला काही तरी नाव सुचतंय का संघटनेसाठी पण संघटनेला नाव मी सांगतो नाव “शिवसेना” यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. आणि मराठी माणसाच्या चळवळीला एक नाव भेटले.
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे पाच लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्या पासूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्कवरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थ, बाळासाहेब आणि गर्दी आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गणित आज कायम आहे. बाळासाहेब ठाकरेंची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मतोश्री, मुंबई येथे त्यांच्या घरी यायचे परंतु बाळासाहेब कोणाला भेटण्यासाठी कोणापुढे झुकले नाही. हा बाळासाहेबांचा अजून एक गुण समोर येतो.
१९९० या काळात, काश्मीर मधील इस्लामी दहशतवाद्यांनी कश्मिरी पंडितांना तिथून हकलावायला लावले होते. अमरनाथ यात्रा सुरू होती. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा थांबविण्याची धमकी दिली. तेव्हा बाळासाहबे यांनी खडसावून सांगितले की हज यात्रेसाठी जाणाऱ्या ९९ टक्के फ्लाईट मुंबई विमान तळावरून जातात त्या कश्या आकाशात उडतात बघूया मक्का-मदीनाला कसा येथून प्रवास होतो तो आणि दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली.
सन १९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे ‘आप की अदालत’ या कार्यक्रमांमध्ये गेलेले. जेव्हा त्यांना असे विचारण्यात आले की या घटनेमागे शिवसैनिकांचा हात आहे का? तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले, ‘जर हे काम शिवसैनिकांनी केले तर ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असती. आज झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृति विघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही.
जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था, साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार ‘ठाकरी’ मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली आहे.