Skip to content Skip to footer

कॉ-ऑपरेटिव्ह बँक युनियनकडून मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ८३ लाख ११ हजाराची मदत !

कॉ-ऑपरेटिव्ह बँक युनियनकडून मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ८३ लाख ११ हजाराची मदत !

देशात आणि राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या संसर्गला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड – १९ या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक मदत केली आहे. आजवर अनेक मान्यवरांनी तथा कॉर्पोरेट कंपन्यांनी या लढ्यात शासनाचे हात बळकट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना प्रणित कॉ-ऑपरेटीव्ह बँक युनियनकडून मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ८३ लाख ११ हजाराची मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अहवानाला हाक देत शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सांगली जिल्हयातील कर्मचारी यांच्या देणगीतून आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ११ हजार इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.

या पैकी १ कोटी ५ लाख ही रकम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि सांगलीच्या कर्मचाऱ्यांचे १९ लाख, तर रत्नागिरी येथील कर्मचाऱ्यांचे ८ लाख ११ हजार परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हातात सुपूर्त करण्यात आले आहे. तसेच शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या समारंभात ३६ लाखाचा निधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे युनियनचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सुपूर्द केला आहे.

Leave a comment

0.0/5