Skip to content Skip to footer

शिवसेनेला एनडीए मधून बाहेर पडण्यास भाग पाडण्यात आलं – संजय राऊत

शिवसेना एनडीए मधून बाहेर पडली तेव्हा संपूर्ण एनडीए विस्कळीत झाली आम्हाला इंडियमधून बाहेर पडण्यास भाग पाडण्यात आले असे वक्त्यव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना भाजपावर जोरदार टीका करत कृषी विधेयकावर भाष्य केले.

एनडीए घटक पक्षात कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरे झाले असते असे मतही राऊत यांनी व्यक्त केले आहे. टीडीपीचं काही नक्की नसतं, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने, जाणते आणि निष्ठावान होतो. आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.

Leave a comment

0.0/5