Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जातो तसं आम्हाला तात्कळत ठेवले जाते

राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जातो तसं आम्हाला तात्कळत ठेवले जाते

शिवसेना आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांचयाकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधीबाबत लाड होतात. मात्र आम्हाला तात्कळत ठेवले जाते असे म्हणणे शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापुढे मांडले.

तसेच एकाद्या योजनेचे काम देताना त्यांना झुकते माप दिले जाते असा सूर बैठकीत सेनेच्या सर्व नेत्यांनी ओढला होता. साध्य मुख्यमंत्री शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांची भेट घेणार आहे. तसेच सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांशी संवाद साधला होता.

मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यादेश काढले जात नाहीत. आपले सरकार असताना कामे होत नाहीत, अशा तक्रार आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये निधीबाबत दुजाभाव केला जातो असा सूर काही आमदारांनी लावला. ‘संबंधितांशी बोलून व प्रसंगी आदेश देऊन तुमच्या तक्रारी दूर करेन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले असेही सूत्रांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5