Skip to content Skip to footer

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर | सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानकडून गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली.

दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला.

Leave a comment

0.0/5