नवी दिल्ली – आपल्या देशात शब्दांचे अर्थ बदलण्याची ताकत आहे. पहिले अभिनंदन या शब्दाचा अर्थ कॉन्ग्रैचुलेशन होता. मात्र आता या शब्दाचा अर्थच बदलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. विज्ञान भवनमध्ये ‘कन्स्ट्रक्टशन टेक्नॉलॉजी इंडिया २०१९’चे उदघाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले कि, वैमानिक अभिनंदन यांचे शौर्य आणि संयमाचे कौतुक सोशल मीडिया आणि संपूर्ण देशभर होत आहे. आपल्या देशात शब्दांचे अर्थ बदलण्याची ताकत आहे. पहिले अभिनंदन या शब्दाचा अर्थ कॉन्ग्रैचुलेशन होता. मात्र आता या शब्दाचा अर्थच बदलला आहे. हा नवीन भारत आहे. याची ताकत काही वेगळीच आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.