Skip to content Skip to footer

संरक्षण मंत्र्यांनी घेतली विंग कमांडर ‘अभिनंद वर्धमान’ यांची भेट

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानद्वारे कालरात्री उशिरा सुटका करण्यात आली होती. अभिनंदन हे भारतीय हवाई सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना त्यांच्या हद्दीमध्ये पिटाळत असताना पाकिस्तानच्या हाती लागले होते. अभिनंदन यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागल्यानंतर देखील अद्वितीय शौर्या दाखवत सुरक्षा विषयक कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती लागू दिली नाहीत. अभिनंदन यांनी दाखवलेल्या या शौर्यामुळे सध्या देशभरामधून त्यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण सुरु आहे.

दरम्यान,संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांनी आज ‘अभिनंद वर्धमान’ यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेटी घेतली. जखमी अभिनंदन यांच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णलयात उचार असून, रविवारपर्यंत अभिनंदन यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या देखील होणार आहेत. अभिनंदन यांनी सकाळी हवाई दलप्रमुख ‘बी.एस.धनोआ’ यांची भेट घेऊन, आपल्या बरोबर पाकिस्तानच्या ताब्यात असताना नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती दिली.

Leave a comment

0.0/5