Skip to content Skip to footer

जातीचे राजकारणात कधीही न करणे हीच बाळासाहेबांची शिकवण- खा. आढळराव पाटील

शिवसेना पक्षात जातीला कधीच महत्व दिलेले नाही आहे. आज वेगवेगळ्या जातीचे सामान्य शिवसैनिक आमदार आणि खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. शिवसेनेत येणारा फक्त शिवसैनिक या नावानेच ओळखला जातो आणि हीच शिकवण घेऊन सर्व शिवसैनिक महाराष्ट्रात वावरत आहेत. शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने जात-पात मानतात म्हणून आरोप लावले आहेत. परंतु बाळासाहेबांच्या तालमीत शिकलेले खा. शिवाजीराव आढळराव पाटील कसे काय जातीचे राजकारण करू शकतात हाच प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसैनिकांना पडलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणात कधीही जाती विषय बोलताना माझा कार्यकर्ता कोणत्या जातीचा आहे त्यापेक्षा तो माझा शिवसैनिक आहे या गोष्टीलाच मी महत्व देतो.

खा. आढळराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले की, आपल्या विरुद्ध मराठा समाजाचे उमेदवार मैदानात उतरणार आहे. त्यावर कोण विचारल्यावर डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीला उभे राहणार आहे. त्यावर खा. पाटील म्हणले डॉ. अमोल कोल्हे हे मराठा समाजाचे नसून माळी समाजाचे आहे. असे खा. पाटील यांनी पत्रकारांना बोलून दाखविले होते परंतु मीडियाने आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोललेल्या वाक्यात तोड-मोड करून खा. पाटील हे जातीचे राजकारण करत आहे अशी खोटी बातमी पसरवण्याचे काम चालू केले आहे. महराष्ट्रात जनतेला माहित आहे की, शिवसेना पक्षात जातीला थारा नाही हे कुठेतरी विरोधक विसरत चाललेले आहे.

येणाऱ्या निवडणुकीला लक्ष करून कुठेतरी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिमा मालिन करण्याचे काम सध्या विरोधकांनी चालू केलेले आहे. आज बैलगाडाचा प्रश्न असो की, विमान तळाचा किंवा नाशिक-पुणे लोहमार्गाचा प्रश्न आपली खंबीर भूमिका लोकसभेत मांडण्याचे काम खा. पाटील यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर किती ही आरोप केले तरी येणाऱ्या निवडणुकीला खा. पाटील यांचा विजयी पक्का आहे.

2 Comments

  • Rampal Muley
    Posted March 5, 2019 at 9:11 pm

    शिवाजी दादा छक्का लगाकर अपनी राजनीतिक पारी की समाप्ति करेगें. शिवाजी दादा महान व्यक्ति 🤷‍♀️ है।। 🌷🌷🙏🙏

Leave a comment

0.0/5