Skip to content Skip to footer

Air Strike- वायूसेनेने केंद्र सरकारला सोपवले हल्लाचे पुरावे

वाहिंदुस्थानच्या वायूसेनेने केंद्र सरकारला हवाई हल्ल्याचे पुरावे सोपवल्याचे सांगितले जात आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यूसेनेने सॅटेलाईट आणि रडारच्या सहाय्याने घेतलेल्या प्रतिमा या पुराव्यांमधअये जोडल्याचे सांगण्यात आले आहे. वायूसेनेने सोडलेले 80 टक्के बॉम्ब हे अचूकपणे निशाण्यावर बसले आहेत असं हवाई दलाने सांगितले आहे.

हवाईदलाने सादर केलेला अहवाल हा 12 पानांचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अहवालामध्ये बालाकोटचे हाय रिझोल्युशन म्हणजेच अत्यंत सुस्पष्ट फोटोदेखील जोडण्यात आलेले आहेत. हा अहवाल किंवा फोटो सार्वजनिक करायचे अथवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्र सरकारचा असणार आहे.

वायूसेनेच्या अहवालात म्हटलंय की जे बॉम्ब विमानातून पाडण्यात आले ते थेट इमारतींच्या आतमध्ये जाऊन पडले. त्यामुळे जे नुकसान झालं आहे ते या इमारतींच्या आतल्या भागात झालं आहे. हे नुकसान प्रचंड झाल्याचाही अंदाज आहे. जी मिसाईल सोडण्यात आली होती ती इमारतींचे छत भेदून आतमध्ये घुसली आणि त्यांनी आपले लक्ष्य टीपले. बालाकोटमधील सगळे अड्डे उध्वस्त झाल्याचं वायूसेनेने म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5