Skip to content Skip to footer

जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल मधुमेहाचा वाजं जी. !

शिरुर (कान्हूरमेसाई) :  मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने  यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे.  गतवर्षी १८० ते २०० रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत.  ग्राहकांसाठी आंबट झालेली  जांभळे  उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत.  त्यामुळे आता , जांभूळ , पिकल्या  झाडाखाली  मधूमेहाचा ढोल वाज जी , असे  म्हणण्याची वेळ आली आहे.  गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत जांभळाची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागातील  प्रमुख मार्गावर जांभळाचे स्टॉल सजले असून मुख्य बाजारामधेही जांभळे मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत.

मधुमेही  रुग्णाकडून जांभळास  मागणी  होऊ लागल्याने दर वाढले  आहेत.  यंदा  जांभळाचा दर २२० रुपये  किलोपर्यंत गेला आहे. यामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी  व्यक्त  केली. सध्या कोकण व मावळ  परिसरातून आवक  सुरू झाली  आहे.  मागणी वाढल्याने जिल्ह्यातील अनेक गावामधूनही किरकोळ प्रमाणात जांभूळ विक्रीसाठी  येत असले तरी  मागणीच्या  तुलनेत  हा पुरवठा  कमी आहे.

पुणे येथील महात्मा फुले भाजी  चौक , तसेच  चंदननगर ते वाघोली दरम्यान रस्त्याच्या कडेला  असणा्या  फुटपाथ वर  जांभूळ विक्रीसाठी  विक्रेते  बसतात.  काळी व आकाराने  मोठी असलेली  जांभळे  आकर्षित करीत आहेत. जांभूळ फळ  व त्याच्या   बियांची पूड  मधुमेहावर उपचार करते असे सांगितले  जात असल्याने  जांभळाला  मागणी वाढली  आहे.

Leave a comment

0.0/5