जम्मू कश्मीरमधील गुरूवारी बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. ग्रेनेड झालेल्या हल्ल्यात 32 जण जखमी झाले होते. जखमींपैकी एका व्यक्तीचा गुरूवारीच इस्पितळात मृत्यू झाला होता.
पुलावामा हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरवर हाय ऍलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी एका दहशतवाद्याने बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला केला आणि फरार झाला. या हल्लेखोराला पकडण्यात सुरक्षा दलाला यश आले.
प्राथमिक माहितीनुसार हा ग्रेनेडे चीनी बनावटीचा होता. यापूर्वीही दहशतवाद्यांनी या भागाला लक्ष्य केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात सरकारी बसचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.