Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी पक्षाने केला उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च…

राजकीय पक्षांचा बराचसा खर्च हा लोकांनी दिलेल्या देणग्यांवर चालतो. त्यामुळे लोकांकडून मिळालेला पैसा कसा आणि कुठे खर्च केला जातो याची माहिती सार्वजनिक करणे महत्त्वाचे असते. ADR (Association for Democratic Reforms) या संस्थेच्या विश्लेषणानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या आर्थिक वर्षांत एकूण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याचे दिसून आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीचं उत्पन्न ८.१५ कोटी रुपये इतके होते, तर पक्षाचा एकूण खर्च ८.८४ कोटी रुपये म्हणजे एकूण उत्पन्नापेक्षा ६९ लाख रुपये जास्त आहे. त्यामुळे खर्च केलेल्या पैशाचा स्रोत काय या विषयी अजून सुद्धा राष्ट्रवादी पक्षाने सांगितलेले नाही

याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारणा केली. “ज्या वर्षात पक्षाचं उत्पन्न कमी असेल त्या वर्षी पक्षाकडे जमा असलेल्या डिपॉझिट मधून खर्च करण्यात येतो. मागच्या वर्षीची पक्षाची जी सेव्हिंग आहे त्यातून हा खर्च झाला आहे,” मलिक यांनी स्पष्टिकरण दिले. पण यामुळे लोकांमध्ये वेगळा संदेश जातो का असा पुढचा प्रश्न नबाव मलिक यांना विचारला. त्यावर मलिक सांगतात, “पक्षाचा मागच्या १९ वर्षांचा एतिहास आहे. मागचं जे काही इन्कम आहे, त्यातील काही रक्कम सेव्हिंग असते, काही डिपॉझिट असते आणि त्यातून हा खर्च झालेला असतो असे सांगण्यात आलेले आहे. Association for Democratic Reforms (ADR) या संस्थेनं नुकतंच २०१७-१८ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या जमा-खर्चाचे विश्लेषण केलेले आहे. राष्ट्रीय पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या ऑडिट रिपोर्टमधल्या माहितीच्या आधारावर हे विश्लेषण आहे

Leave a comment

0.0/5