Skip to content Skip to footer

नाशिकची जनता समीर भुजबळ यांना स्वीकारेल का ?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला होता. शरद पवारांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने भाजपविरोधात लढण्याचे आवाहन केले खरं पण, नाशिकचा उमेदवार कोण असणार हे काही सांगितलंच नाही. पण छगन भुजबळांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस हा मात्र, फक्त समीर भुजबळवरच होता. त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार छगन भुजबळ यांचे नाव जाहीर करणार की, समीर भुजबळ यांच्या नावाला पसंदी दर्शवतात हे अजून सुद्धा गुलदस्त्यातच आहे.

छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणले की, समीर जेलमध्ये माझ्यासोबत नसता तर मी जिवंत बाहेर आलोच नसतो, असं सांगून भुजबळांनी कार्यकर्त्यांना पुरतं भावनिक करून टाकल. नाशिक लोकसभा उमेदवार पवार जाहीर करतील ही अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र, पवारनीती ही संकेत देणारी ठरली. दोन्ही कॉंग्रेस पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी त्यांनी घेतलेली बैठक खरोखर फलदायी ठरणार का? ही चर्चा सुरू झाली आहे. परंतु नाशिकची जनता छगन भुजबळ यांच्या जागी समीर भुजबळ यांचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला खासदार उमेदवार म्हणून स्वीकार करणार किंवा नाही यावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a comment

0.0/5