Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे स्वत: लोकसभा लढणार का ?

आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेऊन आपले नातू पार्थ पवार यांचे नाव जाहीर केलेले आहे. त्यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थात त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते.

एका मुलाखती दरम्यान आदित्य ठाकरे यांनी निवडणुकी बद्दल आपले मत मांडताना बोलले होते की, निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेनही. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वा माझे वडील उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही पण, त्यांनी कुटुंबातील इतरांवर ते मत कधीही लादलेले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. आदित्य यांनी आजवर कोणतीही राजकीय निवडणूक लढविली नसली तरी, मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी ते निवडून आले आहेत.

Leave a comment

0.0/5