Skip to content Skip to footer

आनंदराव अडसूळ यांच्या प्रयत्नाने अमरावती येथे आकाशवाणी केंद्राला मंजुरी…

शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्यात अनेक लोकहिताची कामे पार पडलेली आहे त्यातच अजून एक मनाचा तुरा अमरावती येथे लागलेला आहे. खासदार अडसूळ यांच्या प्रयत्ननाने आकाशवाणी केंद्राला मंजुरी मिळालेली आहे. अमरावती सुरू करण्यात आलेल्या आकाशवाणी केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येणारे कार्यक्रम आदिवासी भागातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांना ऐकावयास मिळत नसल्याने अचलपूर या ठिकाणी १०० वॅट एमएम ट्रान्समीटर आकाशवाणी केंद्राची मागणी केंद्रीय नभोवाणीमंत्री यांच्याकडे केली होती.

त्या अनुषंगाने केलेल्या पाठपुराव्याअंती केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाच्या बाराव्या प्लॅन अंतर्गत अचलपूर या ठिकाणी नवीन आकाशवाणी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. लवकरच या आकाशवाणी केंद्राचे भूमिपूजन समारंभ खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नवीन आकाशवाणी केंद्राच्या मंजुरीमुळे अमरावती जिल्ह्याला दोन आकाशवाणी केंद्र मिळाले आहेत हे येथे उल्लेखनीय कामगिरी खासदार आनंदराव अडसूळ यांची आहे. आज २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकार हा शिवसेना पक्षाचा

Leave a comment

0.0/5