Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा जाहीरनामा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सरकारी बंगल्यात आयोजित करण्यात आली होती. पण आचार संहितेत सरकारी संपत्तीचा वापर करता येत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ए वॉर्ड ऑफिसरने तक्रार देखील दाखल करून घेतलेली आहे. येन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. नेत्यांकडून किंवा पक्षाकडून तसंच अन्य कोणाकडून आचारसंहितेचं उल्लंघन केलं जात नाही ना याकडे निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी ही पत्रकार परिषद सरकारी बंगल्यावर आयोजित केल्यामुळे त्यांनी स्वतःला आणि पक्षाला अडचणीत टाकले आहे

Leave a comment

0.0/5