Skip to content Skip to footer

काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैशे मोहम्मदचा

काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा काँग्रेस केंद्रीय कार्यालय येथे जाहीर केला आहे. हा जाहीर करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे सुद्धा हजर होते. परंतु काँग्रेसचा जाहीरनामा हा देशाच्या जनतेच्या भल्यासाठी तयार केला आहे की, देशा विरुद्ध कारवाही करणाऱ्या देशद्रोही विरोधात हेच आज समजत नाही आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करू अशी ग्वाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे देशात राहणाऱ्या शत्रूंना यामुळे पाठबळ मिळेल असे बोलले जात आहे

देश विघातक आरोपीचा निकाल लागेपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा कायदा सुद्धा शिथिल करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलेले आहे. एएफएसपीए कायदा रद्द करू, एएफएसपीए म्हणजे भारतीय जवानांना काश्मीर मध्ये प्राप्त असलेला विशेष अधिकार. जेणे करून त्यांचे अजून खच्चीकरण होईल अशी तरतूद कायद्यात करण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि हुरियतशी बिनशर्त वाटाघाटी करणार असे सुद्धा जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आलेले आहे. काॅग्रेसचा हा जाहीरनामा वाचला की लक्षात येतं की संपूर्ण देश अतिशय योजनापुर्वक कसा खड्ड्यात जाईल याचं विवेचन आहे असेच जाणवते. आज पुलवामा येथे झालेल्या हल्यात ४० च्यावर जवान शाहिद झालेले असताना त्यानंतर सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेणाऱ्या काँग्रेस सरकारकडून हीच अपेक्षा होती असेच आज देशातील जनता बोलून दाखवत आहे.

Leave a comment

0.0/5