Skip to content Skip to footer

बारामतीच्या आजाणत्या राजाचे जाणते उद्योग नीट वाचा.

आपण मनमोहनसिंगांच्या सरकारमध्ये दहा वर्षे शेतीमंत्री होता. त्या काळात डाळींचे भाव दोनशेहे रु.किलोपर्यंत होते.आज ते ऐंशी रु.पर्यंत आहेत. आपल्या सरकारच्या काळात दररोज एक घोटाळा उघडा होत होता. त्यावेळी कधीच आपण तोंड उघडले नाही. मूग गिळून होतात. २६/११/०८ च्या दहशतवादी हल्ल्यात पांच अधिकारी व दोनशेहेवर निष्पाप नागरीक मारले गेले. तो देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला होता. पण बदला घेण्याची सुध्दा आपण कधी भाषा केली नाहीत. माहितीच्या अधिकारासंबंधात मंत्रीमंडळाने केलेल्या प्रस्तावाला साधा खासदार असलेल्या राहुलने केराची टोपली दाखविली त्यावेळीही आपण स्वाभिमान गिळून गप्प राहिलात इतकच काय आपल्याकडे भरपूर साखर कोटा असतानाही आपण ब्राझिलकडून कच्ची साखर आयात करुन साखरेचे दर पाडलेत. त्या मुळे ऊस उत्पादकावर आत्महत्त्येची वेळ आली होती.हे आपण विसरला असाल,
राजकिय स्वार्थापोटी राजू शेट्टीनाही याच विसर पडला असेल,पण त्यात भरडून निघालेला शेतकरी हे विसरू शकत नाही
आपण जाणते राजे म्हणून घेता पण अजाणतेपणी मोदीना कुलभुषण जाधवाना सोडवून आणण्यास सांगता हा शुध्द पोरकटपणा आहे. कारण जाधवांच्यावर हेरगिरीचा आरोप आहे. पाकने त्यांच्यावर कोर्टात केस चालवून त्याना फाशी जाहिर केली आहे. ते काही युध्द कैदी नाहीत,त्यामुळे ते त्याना युध्द कैद्याचा जिनिव्हा करार लागू होत नाही. म्हणूनच भारत सरकारने हा दावा आंतरराष्ट्रिय कोर्टापुढे नेला आहे. तेथे पाकला जाधवांच्या वरील हेरगिरी सारखा गंभीर आरोप सिध्द करावा लागेल. मोदी काही तुमच्या सारखे मूग गिळून सोईस्कर मौन धारण करणारे नव्हेत. जाधवाना सोडा म्हणून लाचारीने सांगण्याऐवजी त्यानी पाकला त्यांच्यावरील आरोप सिध्द करण्याचे आव्हान पाकला दिले आहे. जाधवाना पाक सरकार चांगले जेवणही देत नाही आणि आपले सरकार दहशतवाद्यालला बिर्याणी खायला घालत होते, याची तरी चहाड ठेवा आणि मग मोदीना दोष द्या.
मोदींचा एकच गुन्हा आहे तो म्हणजे नोटाबंदी करून तुमच्या काळ्या संपत्तीवर टाच आणली आहे व बँक तसेच सात बाराला आधार जोडून अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करून नव्वद हजार कोटीची बचत करुन आपल्या सारख्यांच्या भ्रष्ट्राचाराला लगाम घातला आहे,म्हणून आपल्या नेत्ऋत्वाखाली सर्वच ठकसेन एकत्र आहेत आणि ते सर्व मोदींचा सूड घेऊ इच्छित आहेत .हे जनता जाणून आहे.याचे आपण जरुर भान ठेवावे. आरोपासाठी आरोप करू नयेत.
टीप: आता जनतेला खरं काय व जुमला काय असतो, हे कळून चुकले आहे.

Leave a comment

0.0/5