Skip to content Skip to footer

मनसे खेळाच्या मैदानात ही नाही आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून खेळाडूंवर टीका करते

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीला न उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे असे खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जाहीर केले आहे. परंतु येणाऱ्या लोकसभेला भाजपा उमेदवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बाजू मांडणार असे सूचक विधान सुद्धा केलेलं होत. त्यामुळेच मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्या अध्यक्षांच्या या निर्णयावर बुचकळ्यात पडलेले आहे. काही दिवसापूर्वी दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचाराला शिवाजी पार्क येथे न बोलावता मनसेचे संदीप देशपांडे हजर राहिले होते त्यामुळे अनेकांना धक्का बसलेला होता आणि मनसेची खरी भूमिका जनते समोर आलेली होती.

आज राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीला समोर ठेऊन मावळ, सोलापूर आणि नांदेड येथे सभा घेणार आहे. सोलापूर मध्ये सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहे तर नांदेड मध्ये अशोक चव्हाण आणि मावळ मध्ये राज ठाकरे यांचे कट्टर शत्रू अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आणि यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे या भागात सभा घेणार आहे. आज राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे कुठेतरी मनसे पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला उघड-उघड मदत करताना दिसत आहे. परंतु राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसेचे कार्यकर्ते सुद्धा नाराज झालेले दिसून येत आहे.

मनसे या पक्षात असणारे कार्यकर्ते हे मूळचे शिवसेना पक्षाचे आहे. त्यांनी फक्त शिवसेना आणि त्यानंतर मनसेलाच मतदान केलेली आहे परंतु आता खुद्द पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आपली मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पारड्यात टाकण्याची वार्ता करत आहे आणि ही गोष्ट मनसेच्या कार्यकर्त्यांना खटकत आहे. कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात मनसे कार्यकर्ते भांडत होते आज त्यांच्या उमेदवारांचा कसा काय आपण प्रचार करणार असाच प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे. आज मनसे घेत असलेले निर्णय हे शरद पवार यांच्या सांगण्या वरून घेत आहे असेच दिसून येते आणि या निर्णयाची किंमत राज ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीला चुकवावी लागणार आहे.

Leave a comment

0.0/5