Skip to content Skip to footer

माझं मत माझा निर्धार ध्येयशील माने म्हणजे “मीच” खासदार अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

अगामी लोकसभा निवडणुकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेना पक्षाने ध्येयाशिल माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. युतीच्या पहिल्या सभेला कोल्हापुरातील झालेल्या सभेला जनतेचा मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना पक्षाचे दोन्ही उमेदवार जिंकणार असेच आज बोलले जात आहे. परंतु माने यांच्यासाठी हातकलांगने मतदार संघातील जनतेने चालवलेल्या एका आगळ्या-वेगळ्या अभियानामुळे मतदार संघ चर्चेत आला आहे.

माझं मत माझा निर्धार ध्येयाशिल माने म्हणजे “मीच” खासदार या अभियानाला जनतेने सुरवात करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला माने हेच पुढचे खासदार असतील अशी छापच माने यांच्यावर पडलेली दिसून येत आहे. आज राजू शेट्टी यांना जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षच्या कारखानदारीस मोडीत कडण्यासाठी खासदार म्हणून दिल्लीला पाठविले होते परंतु निवडणुकीला आपल्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेसच्या महाआघाडीत सामील झालेले आहे त्यामुळे तेथील मतदार हे खासदारांवर नाराज असताना दिसून येत आहे व याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीला जरूर बसणार आहे. आज जिल्हा परिषेदेत महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या माने यांच्या पाठीशी पूर्ण जनता खंभीरपणे उभी आहे. आज माने परिवाराने केलेल्या कामाची पोचपावती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला त्यांना जरूर भेटणार असेच आज बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5