लोकसभा निवडणुकीला प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष सोशल मिडीयाचा सुद्धा माध्यम म्हणून वापर करत असतात. त्यातच राज ठाकरे यांनी भाजपा विरोधात मोर्चा स्थापन करून भाजपा उमेदवारांच्या विरोधात महाआघाडीच्या स्टेजवरून भाजपवर तोफ डागणार आहेत अशीच माहिती समोर येत आहे. यावर भारतीय जनता पक्षाने व्यगंचित्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर भाजपाने व्यगंचित्र आपल्या सोशल मिडीयावर टाकले आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात भूमिका घेतलेली होती. आता २०१९ ला राष्ट्रवादी-काँग्रेसला पाठिंबा देऊन भाजपा विरोधात मोर्चा स्थापन केला आहे.
या व्यगंचित्रातून असे दर्शविण्यात आलेले आहे की, चला चला राष्ट्रवादी काँग्रेसला पाडण्यासाठी भाजपाला साथ द्या. २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादी आणि २०१९ राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दया आपल्याला हे काय मूर्ख समजतात का? थोडीशी साहेबांना अक्कल द्या असे या व्यगंचित्रातून राज ठाकरे यांना टोमणा मारण्यात आलेला आहे. आज राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला पाठिबा देऊन आपल्याच कार्यकर्त्यांना नाराज केले आहे. ज्या पक्षाच्या विरोधात २००४ आणि २००९ च्या निवडणुकीला मनसे कार्यकर्ते लढले आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ मनसेच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे हीच गोष्ट सध्या कार्यकर्त्यांना खटकत आहे आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीला याचा जरूर फटका बसणार असेच बोलेल जात आहे.