Skip to content Skip to footer

विना परवानगी सभा घेतली काँग्रेस विरुद्ध आचारसंहिता भंग

आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पश्चिमचे फिरते पथक यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदवीलेली आहे. अकोला पश्चिमचे फिरते पथक क्र. ३ चे प्रमुख जितेंद्र रामभाऊ गायकवाड हे दिनांक ४ एप्रिल रोजी गस्तीवर असताना त्यांना आपातापा चौक येथे कॉग्रेस पक्षाची विनापरवानगीने सभा सुरु असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी सदरच्या ठिकाणी भेट देवून सभेच्या परवानगी बाबत माहिती विचारली. सभेबाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे व परवानगी सादर करण्यास आयोजक रवि श्रीराम शिंदे असमर्थ ठरले. त्यानंतर पथकाने सभेचे व्हीडीओ रेकॉर्डींग केले. ही सभा आयोजकाने निवडणुक आयोगाची कोणतीही पुर्व परवानगी घेतलेली नसताना, तसेच अंदाजे १२५ नागरीक जमा केल्याने आचारसंहितेचा भंग केला आहे.त्यानुसार अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये आयोजकांन विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या अधचणीत वाढ झालेली दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5