काँग्रेस-राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्याविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे देवपारे चांगले संतापले असून, ”माझा अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो’ अशी धमकी त्यांनी एका पत्रकार परिषदेत रवी राणा यांना दिली. गुणवंत देवपारे हे अमरावती लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं निवडणूक लढवत आहेत. देवपारे यांनी रवी राणा यांच्या विरोधात सिटी कोतवालीत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसापूर्वी रवी राणा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला म्हणजे नावणीत कौर-राणा यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. परंतु त्या जागेवर वंचित आघाडीने गुणवंत देवपारे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आंबेडकर राणा यांना कसे काय पाठिंबा देऊ शकतात, तसेच राणा ह्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षच्या जाहीर पाठिंब्याने उभ्या राहिल्या आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणीला आंबेडकराचा विरोध आहे. त्यामुळे कुठेतरी आंबेडकरी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राणा करत असताना दिसत आहे असे आरोप देवपारे यांनी लगावले आहेत.
k