Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचा फडणवीसांवर आरोप; ‘एकनाथ निमगिडे खुनाच्या प्रकरणात अप्रत्यक्ष सहभाग’

महाराष्ट्र बुलेटिन : सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अजून एक खळबळजनक वृत्त समोर येत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या खुनात अप्रत्यक्ष सहभाग आहे, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीने नागपुरात आंदोलन देखील केले.

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. नागपूरच्या धरपेठ येथील फडणवीसांच्या निवासस्थानाजवळ बुधवारी सकाळी हे आंदोलन केले गेले. यावेळी फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. दरम्यान पोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा शामकुळे, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती म्हणजे एकनाथ निमगिडे हे एक आर्किटेक्ट होते. ६ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या वादातून त्यांच्या खुनाची सुपारी घेऊन काही अज्ञातांनी त्यांची हत्या करण्यात आल्याचे नागपूर पोलिसांनी अलीकडेच सांगितले होते. विशेष म्हणजे ही जमीन फडणवीसांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आहे. या खुनामागे देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे असा दावा वेदप्रकाश आर्य यांनी केला असून पोलिसांनी जर खोलात शिरून या प्रकरणाची चौकशी केली तर खरं काय आहे ते स्पष्ट होईल, असे देखील त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5