Skip to content Skip to footer

पंकजावर टीका केल्याशिवाय बारामतीच्या दरबारात नोकरी मिळत नाही – सदाभाऊ खोत

लोकसभा निवडणुकीला प्रत्येक पक्षात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालूच असतात. त्यातच मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. पंकजावर टीका केल्याशिवाय बारामतीच्या दरबारात नोकरी मिळत नाही असा टोमणा कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मारला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देवळा आणि पुस तालुक्यात अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

शरद पवार यांनी आपल्या राजकीय फायदयासाठी अनेक वर्ष बीड जिल्ह्यतील जनतेचा फायदा घेतला आहे. मात्र विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच कृष्णा खोऱ्याचे पाणी का नाही मिळवून दिले असा सवाल सुद्धा सदाभाऊ खोत यांनी पवारांना विचारला आहे. पंकजा मुंडे यांनी समाजा मध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाला बरोबर घेऊन जिल्ह्याची प्रगती केली आहे. अशा शब्दात पंकजा मुंडे यांची स्तुती केलेली आहे. बीड जिल्यात प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी खोत त्यांनी सभा घेतल्या आहे.

देशाला स्वतन्त्र मिळाल्या नंतर वर्तमानात शेतकऱयांचे हित जोपासणारे सरकार मागील साडेचार वर्षा पासून महाराष्ट्रात काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या चार वर्षांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय चांगले निर्णय घेऊन त्यांचा सन्मान वाढवल्याचेही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर संकटे असो शेतकर्यांच्या मदतीला धावून येणारे हे सरकार असल्याने लोकांनी आता वैचारिक पातळीवर विचार करावा. पवारांनी मराठवाड्याला कृष्णा खोर्याचे पाणी मिळू दिले नाही. मात्र पंकजा मुंडे या पाण्यासाठी सत्तेत संघर्ष करत असून बीड जिल्ह्याला ५ टीएमसी पाणी लवकरच मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले

Leave a comment

0.0/5