Skip to content Skip to footer

राजू शेट्टी यांचा आपल्या नावाचा व्यक्ती उभा करून विरोधांवर बिनबुडाचे आरोप

हातकणंगने मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटननेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वतःच्या नावाचा अजून एक उमेदवार उभा करून विरोधकांवर बिनबुडाचे आरोप लावले आहे. माझी मते फुटण्यासाठी विरोधकांनी मुंबईतून राजू शेट्टी नावाच्या इसमाला माझा विरोधात उभा केला आहे अशी खोटी थाप देऊन मतदार संघातील शेतकऱयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा अजब प्रकार सध्या राजू शेट्टी यांनी चालू केलेला दिसून येत आहे. तसेच स्वतः निवडणूक आयोगाकडे याबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे.

आज खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱयांच्या मतांवरच संसदेत निवडून गेले आहे. तेव्हा त्यांचे हें युद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आता पर्यंत होते. परंतु आज स्वतःत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यान बरोबर युती करून शेट्टी यांचा खरा चेहरा शेतकर्यांन समोर आलेला आहे आणि हें पाप लपवण्यासाठी शेट्टी नावाचा उमेदवार उभा करून विरोधकांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना दिसत आहे. त्यातच कारखानदार प्रतीक पाटील यांच्या भावाला तिकीट देऊन शेट्टी हें कारखानदार काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना उघड उघड मदत करतात हें सिद्ध झालेले आहे.

आज मावळ मतदार संघात शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या नेत्यांना मदत कशी काय शेतकऱयांचे खोटे नेते करू शकतात हा प्रश्न आज हातकणंगने मतदार संघातील प्रत्येक शेतकऱ्यांना पडलाच पाहिजे. ज्या शेतकर्त्यांनी तुम्हाला संसदेत पाठवले त्याचा शेतकऱयांचे रक्त लागलेल्या हातात हात घालताना राजू शेट्टी यांना लाज वाटत नाही का? हेच आज शेट्टी विसरले आहे. त्यामुळे शेट्टी जिंकण्यासाठी कुठेतरी आपल्याच नावाचा उमेदवार उभा करून शेतकऱयांची सहानुभूती मिळवत आहे. येणाऱ्या निवडणुकीला ही जनता अश्या खोट्या नेत्याला आपल्या मतदानाने पाडून उत्तर देईल.

Leave a comment

0.0/5