Skip to content Skip to footer

हा हिंदूस्थान आहे. इटली नाही. राहुल गांधीला सांगू इच्छितो – उद्धव ठाकरे

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गुहागर येथे शिवसेना उमेदवार आनंद गीते यांच्या झालेल्या प्रचार सभा दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. हा हिंदूस्थान आहे. इटली नाही. राहुल गांधीला सांगू इच्छितो येथे नामर्द जन्माला येऊ शकत नाहीत. राहुल गांधी यांनी सावरकरांवर हिनकस पद्धतीने टीका केली आहे. ज्यांनी देशासाठी हौतात्म पत्करले आहे. ते आम्ही विसरू शकत नाही. जवाहर लाल नेहरू यांनी स्वातंत्र्यांसाठी जे काय केले त्यांचा आम्हाला आदर आहेत. परंतु सावरकरांवर टीका करणे योग्य नाही. सावरकारांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. सावरकर आणि त्यांचे बंधू एकाच जेलमध्ये होते. परंतु त्यांना माहित नव्हते. राहुल गांधी या नालायक कारट्याने सावरकरांचा अवमान केला आहे अशा शब्दात राहुल गांधी यांचा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.

तसेच लाज नाही वाटत या राष्ट्रवादीच्या या कॅम्पेनवर सुद्धा जोरदार टीका केली. राष्ट्र्वादीने लाज नाही का वाटत, अशी ही जाहिरात होती. हा प्रश्न विचारणारे कोण होते तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लाजेशी कधी संबंध आला काय. आम्ही युती केल्यानंतर शिवसेना लाचार झाली असे शरद पवार म्हणत होते. मी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारतो की तुम्हाला लाज वाटत नाही काय. शरद पवारांची राजकीय कारकिर्द गद्दीरीने झालेली आहे. ज्यांच्यासोबत राहिले त्यांच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले आहे. पवारांनी सुरुवातील राजीव गांधींवर टीका केली. सोनिया गांधीवर टीका केली. तरी काँग्रेसच्यासोबत राष्ट्रवादी जाते. ही लाचारी आहे असे बोलून पवारांना चिमटा काढला.

Leave a comment

0.0/5