आगामी लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीला चित करण्याचा बेतच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आखला आहे असेच समजते. दोन दिवसापूर्वी भाजपची बारामती मध्ये मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेच आयोजन करण्यात आलेले होते. या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी अशीच सर्व भाजपा कार्यकर्त्याची इच्छा होती. परंतु मोदी यांच्या जागी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची बारामती मतदार संघात सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यान मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज भाजपा पक्षाचे बडे-बडे नेते बारामती मतदार संघात तळ ठोकून बसलेले आहे. या सर्व घडलेल्या घडामोडीमुळे बारामती मतदार संघ आताच्या परिस्थितीला राष्ट्रवादी पक्षाला जिंकणे कठीण जाणार आहे. त्यातच आता याच मतदार संघात केंद्रीय मंत्री स्मुर्ती इराणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्याच्या सुद्धा सभा बारामती मतदार संघात होणार असल्याचे भाजपाचे वासुदेव काळे यांच्या कडून सांगण्यात येत आहे. आज भाजपा दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची फळी बारामती मध्ये उतरून राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे काम करत असताना दिसत आहे.
कोनीत्याही परिस्थितीत बारामती मतदार संघातील जागा खेऊन आणायची असेच भाजपा नेत्यांनी ठरविले आहे. १९ एप्रिल रोजी अमित शहा सभा घेणार आहे तर, २१ एप्रिल रोजी नितीन गडकरी सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. बारामतीच्या शारदा प्रागंणात शाह यांची सभा होणार आहे. तर योगी आदित्यनाथ खडकवासला येथे १९ एप्रिल रोजी सभा होणार आहे. दुसरीकडे राज्यसत्तरीय नेत्यानं पैकी चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, राम शिंदे, गिरीश महाजन यांच्या बारामती मतदार संघात ठीक ठिकाणी सभेचे आयोजन होतच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बारामतीचा गड जिंकणे अधिक कठीण जाणार आहे.