Skip to content Skip to footer

“चौकीदार चोर नाही” तर अनेक वर्ष राज्य करणारा “गांधी परिवार चोर आहे”.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेच्या खात्यावर ७२००० हजार टाकण्याचे आश्वासन सर्व जनतेला दिलेले आहे. हाच मुद्दा घेऊन काँग्रेस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत आहे. देश स्वतन्त्र झाल्या पासून देशात जास्त काळ सत्ता ही काँग्रेस सरकारने उपभोगलेली आहे. आज या काँग्रेस सरकारने चार-चार पंतप्रधान देऊन सुद्धा का या देशाचा विकास झालेला दिसून येत नाही आहे. परंतु आज पुन्हा काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर देशातील जनतेकडे मत मागण्यासाठी आलेले आहे. जसे काँग्रेस देशातील जनतेकडे पहिल्या वेळी सत्ता आपल्या हातात देण्यासाठी सांगत आहे. मग आज विकासाच्या बाता करणारे काँग्रेस वर्षानु-वर्ष सत्ता भोगून सुद्धा देशाचा विकास करण्यात का मागे पडताना दिसत आहे.

नागासाकी-हिमारोशी या बलाढ्य देशावर सुद्धा अणु हल्ला झालेला होता. त्याच मागे-पुढे भारत देश स्वतन्त्र झाला परंतु आज जपानची प्रगती आपण पहिली तर आपल्या देशा पेक्षा किती तरी पटीने प्रगतीमध्ये जपान आपल्या पुढे आहेत. जर जपानची प्रगती होऊ शकते तर भारत देशाची का नाही प्रगती होऊ शकत असाच सवाल आज देशातील प्रत्येक नागरिकांना पडलाच पाहिजे. राहुल गांधी देशातील गरीब जनतेच्या खात्यावर पैसे टाकायच्या बाता मारत असताना दिसत आहे परंतु त्याच देशातील तरुनांच्या हाताला का काम दिले नाही. इतक्या वर्षात देशातील तरुणांना नोकरी न देऊ शकणारे काँग्रेस आज भाजपा सरकारकडे फक्त ५ वर्षाचा हिशेब मागत आहे. तर याच काँग्रेस सरकारकडे मागील २५ ते २५ वर्ष भोगलेल्या सत्तेचा हिशेब मागितला तर हे देऊ शकतात का?

सुजलाम-सुफलाम म्हणून बोलला जाणारा भारत देश काँग्रेस सरकारच्या काळात का नाही शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेऊ शकला. जर इतर देश प्रगतीच्या मार्गावर चालत असताना काँग्रेसने का देशाचा विकास करू शकली नाही, देशातील तरुणांना सक्षम करण्यासाठी काँग्रेसने काय काम केले, आज ही शेतकऱयांना आत्महत्या करायची वेळ का येत आहे आणि वरून म्हणतात “चौकीदार चोर है” आज विकासाच्या बाता मारणाऱ्या काँग्रेस सरकारची खेळी देशातील जनतेच्या चांगल्या लक्षात आलेली आहे. आज जरी देशात लोकशाही वावरत असली तरी या देशाचे राज्यकर्ते अनेक वर्ष फक्त गांधी घराणेच आहे.

Leave a comment

0.0/5